जातपडताळणी अर्जासाठी
आठवडी बाजारात शिबिरे घ्या

जातपडताळणी अर्जासाठी आठवडी बाजारात शिबिरे घ्या

पुणे, ता. २६ ः अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील (एसटी) नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे, त्यासाठीचे अर्ज भरून आठवडी बाजारात खास शिबिरांचे आयोजन करा, अशी सूचना राज्याचे नवनियुक्त सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी (ता. २५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) केली.
बकोरिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेस भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, स्नेहल भोसले, अनिल कारंडे, आरती भोसले, रवींद्र कदम, वृषाली शिंदे आदी खातेप्रमुखांसह ‘बार्टी’तील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
‘बार्टी’ आणि राज्याचा सामाजिक न्याय हे दोन्ही विभाग अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी संयुक्तपणे काम करत आहेत. राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने ‘बार्टी’मार्फत या परीक्षांच्या तयारीसाठीचे दर्जेदार पद्धतीचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

प्रस्ताव त्वरित निकाली काढू
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दाखल केलेले जात पडताळणीसाठीचे सर्व प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येतील. जेणेकरून या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेत मिळू शकेल आणि त्यांचा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश हा केवळ जात पडताळणीअभावी अडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे ‘बार्टी’चे महासंचालक वारे यांनी या वेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com