केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 
परीक्षेसाठी ३१४ विद्यार्थ्यांना मदत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ३१४ विद्यार्थ्यांना मदत

Published on

पुणे, ता. २६ ः केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी महात्मा जोतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी ३१४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाज्योती’चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजे, एनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आदी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर झाला आहे. निकालानंतर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
यानुसार एकूण ३५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ३१४ विद्यार्थ्यांची या अनुदानासाठी निवड करण्यात आली आहे. उर्वरित ४२ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. अनुदानासाठी पात्र ठरलेल्यांपैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत एकूण १ कोटी ४९ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील अद्याप मिळाला नसल्याने ते जमा करता आलेले नाही. या विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याची माहिती उपलब्ध होताच, त्यांचेही अनुदान त्यांच्या जमा केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.