एनईपीच्या माध्यमातून साक्षरता वाढविणार

एनईपीच्या माध्यमातून साक्षरता वाढविणार

Published on

पुणे, ता. २६ ः नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने शालेय शिक्षणाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही. त्यामुळे पायाभूत शिक्षणातल्या महत्त्वपूर्ण बदलांना पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरवात होईल. एनईपीच्या पार्श्वभूमीवर भारत साक्षरता अभियान राबवले जात असून, राज्यातील १२ लाख ४० हजार निरीक्षरांना साक्षर करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका व ‘एनईपी’च्या राज्य समन्वयक नेहा बेलसरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला तीन वर्ष झाल्यानिमित्त नवी पेठेतील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात बेलसरे बोलत होत्या. या वेळी सीबीएसईचे पुणे विभागीय संचालक रामवीर, केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बेलसरे म्हणाल्या, ‘‘राज्याचा शिक्षण आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. एनईपीनुसार इयत्ता दहावी-बारावीचे महत्त्व कमी करणे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकडे घेऊन जाणे आदी गोष्टी केल्या जात आहेत. ‘एनईपी’नुसार पायाभूत शिक्षणाचा टप्पा पुढील शैक्षणिक वर्षापासून अमलात आणला जाणार आहे. त्या संदर्भातील सर्व पूर्वतयारी राज्य सरकारने केली आहे.’’

केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राला पाच शैक्षणिक वाहिन्या मिळाले असून त्यांचे काम सुरू आहे. लवकरच या वाहिन्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या जातील, असेही बेलसरे यांनी सांगितले. रामवीर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी वीज व अन्नाची बचत करणे, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, असे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवले जात आहेत. ’’

बिंदू नामावली अंतिम
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक आठवड्याला एक अशा चार बैठका घेतल्या आहेत. सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधला आहे. तसेच, बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.