मॉन्सूनच्या उत्तरार्धात सर्वसाधारण पाऊस

मॉन्सूनच्या उत्तरार्धात सर्वसाधारण पाऊस

पुणे, ता. ३१ : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. ३१) जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाजही यावेळी वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. प्रशांत महासागरातील अल निनोची स्थिती कायम आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळेच पुढील काळात अगदी जानेवारीपर्यंत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मॉन्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरातच सरासरीच्या तुलनेत ९४ टक्के पाऊस पडेल. विशेषतः पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तर हिमालयाशी संलग्न असलेली राज्ये आणि पूर्व मध्य भारतात सरासरी एवढा पाऊस पडेल. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

राज्यातील पाऊस
मॉन्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांतील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ वगळता बहुतांशी भागात सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात राज्यात चांगला पाऊस झाला.

असा आहे अंदाज
- प्रशांत महासागरातील अल निनोची स्थिती अधिक तीव्र होणार
- मध्य आणि पश्चिम भारतात पावसाचा जोर ओसरणार
- ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस
- काही ठिकाणी खूपच तर काही ठिकाणी कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com