आरोग्य शिबीरांमधून सरकारी योजनांची जनजागृती : डॉ. ठाकूर

आरोग्य शिबीरांमधून सरकारी योजनांची जनजागृती : डॉ. ठाकूर

पुणे, ता. ३१ : ‘‘आरोग्य क्षेत्रात सरकारने अनेक उपक्रम, सवलती व सुविधा दिल्या आहेत. त्या नागरिक व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, ठिकठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबीरांमधून सरकारी योजनांविषयी तळागाळात जनजागृती होते,‘‘ असे मत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यात नेत्र, हृदय तपासणीपासून ते रक्तातील साखरेची पातळी, कान, नाक, घसा विभाग, थायरॉईड तपासण्या केल्या. जय गणेश प्रांगण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झालेल्या शिबिरात ६६७ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. त्या वेळी डॉ. ठाकूर बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘रुग्णाचे प्राथमिक निदान करून पुढील उपचारांकरिता चांगली सेवा आपण देऊ शकतो. त्यामुळे आरोग्यविषयक प्राथमिक निदान व जनजागृतीकरिता शिबिरे उपयुक्त आहेत.’’
दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्तम गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, पराग बंगाळे आणि सहकाऱ्यांनी शिबिरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com