मेट्रो इंम्पॅक्ट एरिया

मेट्रो इंम्पॅक्ट एरिया

लीड
--------------------------
जग कितीही ऑनलाइन झाले असले तरी, पुण्यात मंडई, तुळशीबाग, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता येथे पोचल्याशिवाय नागरिकांना पुण्यात आल्यासारखे वाटत नाही. पण, कोथरूड, वनाज असो अथवा पिंपरी चिंचवडमधून पुण्यात यायचे असेल तर, नागरिकांसाठी दोन कळीचे मुद्दे असतात. पहिला म्हणजे वाहतुकीची कोंडी आणि दुसरा तो वाहने कोठे उभी करायची. परंतु, आता या दोन मुद्द्यांची उत्तरे काही प्रमाणात मेट्रोमुळे नागरिकांना मिळणार आहेत. आपले वाहन वापरण्यापेक्षा २५-३० मिनिटांत आणि तेवढ्याच रुपयांत मेट्रोतून ते सहजपणे शहराच्या मध्य भागात पोचू शकतात. त्यामुळे मध्य भागाची वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त, अशी असलेली प्रतिमा आता बदलू शकते. मध्य पुण्यालाही आता वेग येणार असून त्यातून सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट साधून आपले पुणे आणखी वेगवान होईल, अशी अपेक्षा आहे.

-------------------
या घटकांना होणार फायदा
- विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांना, सेंट्रल बिल्डिंग, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना, डेक्कन- जिमखाना, जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना
-----------------
विस्तारित मार्गांचा या भागाला होणार फायदा
- वनाज - गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक ः वनाज, शिवतीर्थ नगर, शास्त्रीनगर, केळेवाडी, एरंडवणे, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शनिवार पेठ, नारायण पेठ, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन आदी
- वनाजवरून आता थेट डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, बालगंधर्व, महापालिका भवन, आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, रूबी हॉल परिसरात पोचणे शक्य.
- वनाजवरून आता शिवाजीनगर न्यायालय स्थानकात मेट्रो बदलून पिंपरी चिंचवडच्या दिशेनेही पोचणे शक्य
--------------
- पिंपरी चिंचवड - फुगेवाडी - शिवाजीनगर न्यायालय ः पिंपरी चिंचवड, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, कृषी महाविद्यालय आदी
- पिंपरी चिंचवडवरून पुणे रेल्वे स्टेशन तसेच शिवाजीनगर न्यायालय स्थानकातून मेट्रो बदलून, महापालिका भवन, संभाजी उद्यान, डेक्कन जिमखान्यापर्यंत पोचणे सहज शक्य
- पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांना मध्य पुण्यात पोचणे सहज शक्य
-------------
विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत
- शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्राद्वारे तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार
- सर्व नागरिकांना दर शनिवार- रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत मिळणार
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com