Pune ZP Recruitment : पुणे जिल्हा परिषदेत मेगाभरती; 1000 जागा, आजपासून प्रक्रियेला सुरुवात होणार

पुणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यास मुहूर्त मिळाला आहे. यानुसार एक हजार रिक्त जागा भरल्या जाणार
pune zilla parishad
pune zilla parishad sakal
Published on

पुणे : अखेर पुणे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यास मुहूर्त मिळाला आहे. यानुसार एक हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया येत्या शनिवारपासून (ता. ५) सुरू केली जाणार आहे.

मागील सुमारे दहा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली होती. आता ही प्रक्रिया सुरू झाल्याने, नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार युवक-युवतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भरती प्रक्रियेत पुणे जिल्हा परिषदेत सर्वाधिक ४३६ आरोग्य सेवकांच्या (महिला) जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त जागांमध्ये प्रामुख्याने आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी आदी विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेने या जागांच्या भरतीसाठीची आवश्यक माहिती मे महिन्यात संबंधित कंपनीला उपलब्ध करून दिली होती. यानुसार किमान जुलै २०२३ महिन्याच्या सुरवातीलाच ही जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी अटकळ बांधली जात होती.

मात्र जुलै महिना संपून ऑगस्ट सुरू झाला तरी जाहिरात प्रसिद्ध होत नसल्याने बेरोजगार युवकांमध्ये अस्वस्थता वाढली होती, असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने डिसेंबर २०२२ मध्येच ही भरती प्रक्रिया करण्याचे संकेत दिले होते.

यानुसार जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याची घोषणाही ग्रामविकास विभागाने केली होती. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरू केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरतीअंतर्गत मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरू केली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या आहेत. त्यानंतर क वर्ग संवर्गातील रिक्त पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे.

पुणे झेडपीतील संवर्गनिहाय रिक्त जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ----३३
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ---- ५९
- कंत्राटी ग्रामसेवक ----३७
- विस्तार अधिकारी (पंचायत) ----०३
- आरोग्य सेवक (महिला) ---- ४३६
- आरोग्य सेवक (४० टक्के) ---- १२४
- आरोग्य सेवक (५० टक्के) ---- १२८
- औषध निर्माण अधिकारी --- २५
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ----०४
- विस्तार अधिकारी (संख्याकी) ----०२
- वरिष्ठ सहायक ----०८
- शिक्षण विस्तार अधिकारी ---०२
- पशुधन पर्यवेक्षक ----३०
- कृषी विस्तार अधिकारी ----०२
- कनिष्ठ आरेखक ---०२
- कनिष्ठ लेखाधिकारी ---०३
- वरिष्ठ सहायक (लेखा) ---०९
- कनिष्ठ सहायक (लेखा) ----१६
- पर्यवेक्षिका ----०९
- कनिष्ठ सहायक ----६७
- रिगमन ---०१
- एकूण ----१०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com