रिव्हिजन एसीएल पुनर्रचना शस्रक्रिया - एक वाढते आव्हान
...आणि फुटबॉल त्याच्यापासून दूर गेला
पुणे, ता. १८ ः केदार हा सोळा वर्षांचा फुटबॉलपटू. मैदानावर किक मारताना त्याच्या गुडघ्याला हिसका बसला. काही समजायच्या आत त्याचा पाय लचकला. तो मैदानावर कोसळला. काही क्षणांतच त्याच्या गुडघ्याला सूज आली. डॉक्टरांकडे नेले असता गुडघ्याचा ‘अँटेरिअल क्रुशीअट लिगामेंट'' (एसीएल) हा महत्त्वपूर्ण अस्थिबंध तुटल्याचे प्राथमिक निदान झाले आणि फुटबॉलचा त्याच्यापासून दूर गेला...
‘एसीएल'' काय आहे?
‘एसीएल'' तुटल्यास गुडघ्यास स्थिरता देण्यासाठी दुर्बिणीतून पुनर्रचना शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अनुभवी नसल्यास १० ते १५ टक्के शस्त्रक्रियांमध्ये प्राथमिक समस्या निर्माण होऊ शकतात. नवीन अस्थिबंध तुटल्यास किंवा प्राथमिक पुनर्रचना शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशी माहिती बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. आनंद जाधव यांनी दिली.
आव्हान कोणते असते?
केदारच्या गुडघ्याच्या गादीला इजा झाल्याचे ‘एमआरआय''मधून दिसले होते. या विशेष प्रकारच्या इजा प्राथमिक शस्त्रक्रियेदरम्यान दुर्लक्षित राहिल्यास नवीन ‘एसीएल'' अस्थिबंधावर सतत ताण येतो. त्यातून हा स्नायू पुन्हा तुटण्याचा धोका असतो. प्राथमिक शस्त्रक्रियेत सांध्याच्या गादीला विविध प्रकारच्या इजा आवर्जून तपासल्या पाहिजे आणि त्या त्याचवेळी दुरुस्त करणे आवश्यक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शस्त्रक्रियांचा वाढीचा कल
‘एसीएल'' अस्थिबंध तुटण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विशेषतः ते मुलांमध्ये जास्त आहे. त्याला कारण सायकलिंग करताना झालेले अपघात, मैदानावर खेळताना झालेली दुखापत किंवा अपघात ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते.
परत शस्त्रक्रिया का करावी लागते?
- शस्त्रक्रियेचे अयोग्य तंत्र
- हाडांमध्ये चुकीच्या पद्धतीने घेतलेली छिद्रे
- गुडघ्याच्या गादीला झालेल्या इजेचे निदान न होणे
- पायांमध्ये अनैसर्गिक अतिवक्रता असल्यास ‘एसीएल''वर ताण येऊन तो निकामी होतो
- नवीन दुखापतीमुळे पुनर्रचित ‘एसीएल'' स्नायू तुटणे
शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची लक्षणे
- गुडघा सतत अस्थिर राहतो
- पाय लचकू शकतो, गुडघ्यात वेदना होतात
- सांधा जखडून जातो
- कार्यक्षम जीवन शैली जगता येत नाही
- खेळता येत नाही
.........
गुडघ्याच्या ‘एसीएल''ची पुनर्रचना शस्त्रक्रिया आव्हानात्मक असते. ही गुंतागुंतीची व किचकट शस्त्रक्रिया अनुभवी व उच्च प्रशिक्षित शल्यचिकित्सकाने केल्यास अधिक चांगली होते. नियमितपणे ‘रिव्हिजन सर्जरी‘ करणाऱ्या डॉक्टरांना या शस्त्रक्रियेचे बारकावे अधिक चांगल्या प्रकारे माहिती असतात व रुग्णांना त्याचा फायदा होतो.
- डॉ. आनंद जाधव, अस्थिरोग विभाग प्रमुख, मणिपाल हॉस्पिटल
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

