‘टेमघर’ दुरुस्तीचे काम थंडावले

‘टेमघर’ दुरुस्तीचे काम थंडावले

Published on

पुणे, ता. १७ : टेमघर धरणाच्या मजबुतीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाला अद्यापही राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे धरण्याच्या दुरुस्तीचे काम थंडावले आहे.
या धरणाच्या माध्यमातून एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आले आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. धरणाचे काम २०१० मध्ये पूर्ण झाले आणि तेव्हापासून धरणात पाणी साठविण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, अवघ्या दोन ते तीन वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली. २०१६ मध्ये धरणातून प्रतिसेकंद २५०० लिटर एवढी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. २०१७ पासून गळती रोखण्यासाठी धरण दुरुस्तीच्या कामाला जलसंपदा विभागाकडून सुरवात करण्यात आली. ९० टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. मात्र, धरणाच्या मजबुतीसाठी दीर्घकालीन कामे करावी लागणार आहेत. त्याकरिता ‘सुप्रमा’ मान्यता मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून त्याला अद्यापही मान्यता मिळालेली नाही, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे सुधारित खर्चाच्या प्रस्तावास मान्यता आवश्यक आहे. भाववाढ आणि इतर कारणांनी हा खर्च वाढला आहे. तर मागील ‘सुप्रमा’मध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची तरतूद नव्हती. परिणामी या धरणाच्या उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी ही मंजुरी आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com