आज पुण्यात शनिवार- १९ ऑगस्ट २०२३

आज पुण्यात शनिवार- १९ ऑगस्ट २०२३
Published on

आज पुण्यात शनिवार- १९ ऑगस्ट २०२३
+++++++++++++++++++++
सकाळी
- प्रदर्शन : दी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे आयोजित ‘निसर्ग’ विषयावरील छायाचित्र प्रदर्शन : स्थळ- बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज मार्ग : १० ते ८.
- पुरस्कार : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ वितरण : व्याख्यान-समाजमाध्यम आणि डिजिटल मीडिया युगातील पत्रकारिता : वक्ते- शहजाद पूनावाला : स्थळ- अॅम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय : १०.३०.
- पुरस्कार : डॉ. संगीता बर्वे यांना ‘झिपरू’ या बालकादंबरीसाठी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत पहिला ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कार’ प्रदान समारंभ तसेच इंदिरा अत्रे यांच्या १० बालसाहित्यकृतींचे प्रकाशन : हस्ते- डॉ. प्रभा अत्रे : प्रमुख उपस्थिती- प्रा.मिलिंद जोशी : आयोजक- दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी : स्थळ- दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी, ३५२, सोमवार पेठ, नरपतगीर चौक, लडकत पंपासमोर : ११.००
-अभिवादन : विवेक साहित्य मंच, विदिशा विचार मंच, अखिल भारतीय साहित्य परिषद- पुणे, भारतीय विचार साधना आणि काव्यशिल्प - पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कवी ना. धों. महानोर यांची अभिवादन सभा : सहभाग- कौशल इनामदार, डॉ. रूपाली शिंदे, डॉ. वर्षा तोडमल : काव्य अभिवाचन- अतुल कुलकर्णी, वलय मुळगुंद, उत्कर्षा मुळगुंद : स्थळ- स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर : ११.००

दुपारी
- प्रकाशन : अन्नपूर्णा परिवार- फाउंडर्स डे निमित्त : ‘वित्त ते लघुवित्त सेतू बांधणारे कॉम्रेड’ पुस्तकाचे प्रकाशन तसेच ‘निर्भय बनो’ विषयावर व्याख्यान : वक्ते- डॉ. विश्वंभर चौधरी : स्थळ-अन्नपूर्णा परिवार, सुवास्तू प्रेस्टिज, एम. डी. सिंहगड इन्स्टिट्यूटमागे, वारजे : ४.००
सायंकाळी
- प्रकाशन : डॉ. दीपक शिकारपूर लिखित आणि नितीन प्रकाशन प्रकाशित ‌‘स्मार्ट टेक करिअर्स''चे प्रकाशन : हस्ते- डॉ. मिलिंद जोशी, प्रमुख पाहुणे- डॉ. सुरेश गोसावी, विशेष उपस्थिती - कृष्णकुमार गोयल, सुप्रिया बडवे, तुषार रंजनकर : स्थळ- विद्यार्थी साहाय्यक समितीचे अच्युतराव आपटे सभागृह, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, हॉटेल ललित महल समोर : ५.३०.
-प्रकाशन : दिलीपराज प्रकाशनातर्फे सुनील गोडसे लिखित ‘कॉर्पोरेट आणि इतर कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन : अध्यक्ष- अच्युत गोडबोले : विशेष अतिथी- सुनील सुकथनकर, अभिराम भडकमकर : सन्माननीय उपस्थिती- अभिजित जोग, यमाजी मालकर, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. प्रिया जामकर, रश्मी उर्ध्वरेषे : अभिवाचन- गौरी लागू, विवेक पतकी : स्थळ- इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, टिळक रोड, शुक्रवार पेठ : ५.३०
- मंथन : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चाकोरीबाहेरचे दुर्गदर्शन’ विषयावर मंथन कार्यक्रम : वक्ते- प्रा. प्र. के. घाणेकर : स्थळ- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, विधी महाविद्यालय मार्ग : ६.००
- प्रकाशन : मर्वेन टेक्नॉलॉजीज पुणे प्रकाशनाच्या आणि योगेश फाटक अनुवादित ‘अहमद शाहा अब्दाली : अफगाणिस्तानचा राष्ट्रनिर्माता’ या पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- पांडुरंग बलकवडे : प्रमुख पाहुणे- डॉ. चंद्रकांत अभंग : स्थळ- भारत इतिहास संशोधक मंदिर, सदाशिव पेठ, भरत नाट्य मंदिराशेजारी : ६.००
- प्रकाशन : विजयराव देशमुख लिखित- शककर्ते शिवराय (पाचवी आवृत्ती), राजा शंभू छत्रपती (पाचवी आवृत्ती) आणि सूर्यपुत्र (तिसरी आवृत्ती) या ग्रंथांचे प्रकाशन : प्रमुख अतिथी- डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. विजय भटकर, मेजर जनरल शिशिर महाजन, पं. वसंत गाडगीळ, संदीप कर्णिक : स्थळ- स्वामी विवेकानंद सभागृह, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पौड रस्ता, कोथरूड : ६.००.
- व्याख्यानमाला : प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमाला : विषय- आविष्काराच्या अवकाशातील निरीक्षण : वक्ते- समिक बंदोपाध्याय : आयोजक- मकरंद साठे, गजानन परांजपे : आर्थिक साह्य- प्राज फाउंडेशन : स्थळ- एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ : ६.००.
- व्याख्यानमाला : ज्ञान प्रबोधिनीचे संस्थपक कै. आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रूप पालटू’ व्याख्यमाला - नववे पुष्प : विषय- अमृतकाळातील भारत- अर्थव्यवस्थेची भरारी व देशांतर्गत आव्हाने : वक्ते- डॉ. वामन पारखी : स्थळ- उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी, ५१०, सदाशिव पेठ : ६.३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com