पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडे

Published on

महिलेच्या पित्ताशयातून काढले एक हजार खडे
वैद्यकीय तज्ज्ञांकडून वीस मिनिटांतच शस्त्रक्रिया पूर्ण

पुणे, ता. १८ : पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातील एक हजारहून जास्त खडे अवघ्या २० मिनिटांत यशस्वीरीत्या काढले. त्यामुळे महिला वेदनामुक्त झाली असून तिला बाळाचे संगोपनही सहज करता येत आहे.
गर्भावस्थेत तिच्या ओटीपोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. गर्भवास्थेमुळे ते काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली. प्रसूतीनंतर मात्र तिला असह्य त्रास होऊ लागला. एके दिवशी अचानक वेदना खूप वाढल्या. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या बाबत लँपरो ओबेसो सेंटरमधील बेरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शहा म्हणाले, ‘‘पित्ताशयातील खड्यांमुळे महिलेचा पोटदुखीचा त्रास वाढला होता. पित्ताशयावर ताण आल्याने अस्वस्थता वाढली होती. बाळाला नियमित स्तन्यपान करणे आवश्यक होते. त्यासाठी ही शस्त्रक्रिया ‘डे केअर'' पद्धतीने करण्यास प्राधान्य दिले. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी या पद्धतीच्या शस्त्रक्रियेची निवड केली.‘

अशी केली शस्त्रक्रिया

ओटीपोटावर तीन छोटी छिद्रे घेऊन ‘लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी‘ शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतर तिला वेदना झाल्या नाहीत आणि शस्त्रक्रियेनंतर २० तासांत तिला घरी सोडण्यात आले. यामध्ये १ ते २ मिलिमीटरचे हिरवट पिवळ्या रंगाचे हजारो खडे दिसून आले. ती बरी झाली आणि कोणत्याही वेदनेशिवाय दैनंदिन कामे करते आहे.

का होतात पित्ताशयात खडे?
रक्तातील कोलेस्टेरॉल, जास्त चरबीयुक्त आहार, आनुवंशिकता, लठ्ठपणा, मधुमेह, बैठी जीवनशैली, संप्रेरकांमधील बदल आणि लठ्ठपणा या प्रमुख कारणांमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. पित्ताचे खडे होण्याच्या रुग्णांचे देशातील प्रमाण १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
---
अशा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे महत्त्वाचे आहे. हे खडे कोलेस्टेरॉल, पित्त आणि क्षारांनी बनलेले असतात. पित्त, क्षार हे यकृतामध्ये तयार होणारे पाचक घटक आहेत. जेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते कडक होतात आणि दगडांचे रूप धारण करतात. त्यावर उपचार न केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. पोटाच्या वरच्या भागाची कोणतीही अस्पष्ट लक्षणे सोनोग्राफीद्वारे तपासली पाहिजे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी या आजारावर लवकर उपचार करणे आवश्यक असते.
- डॉ. शशांक शहा, बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com