वैद्यकीय शिक्षणासाठी ‘पीपल लिंक प्लेसमेंट्स’
नागपूर, ता. १८ ः देश-विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस, एमडी आणि एमएस करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘पीपल लिंक प्लेसमेंट्स’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सुरवातीपासून ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतचे सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन ‘पीपल लिंक’कडून केले जाते.
नागपूर, पुणे, हैदराबाद आणि गुजरात येथून यशस्वीरीत्या संचलनात असलेली ही समुपदेशन संस्था वैद्यकीय प्रवेशासाठी अधिकृत असून नियमांनुसार तिचे कामकाज होत आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांना भारतीय विद्यापीठांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कात अमेरिकेतही पदवी मिळू शकते. विविध वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीपल लिंक प्लेसमेंटसद्वारे उत्कृष्ट महाविद्यालयांची निवड केली जाते.
‘पीपल लिंक प्लेसमेंट्स’चे संस्थापक आणि एम. डी. डॉ. अतुल इंगोले म्हणाले, ‘‘अमेरिकेतूनही डॉक्टर होण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न सहज साकार होऊ शकते. तसेच डिग्री ट्रान्स्फरही शक्य आहे. अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, जैव विज्ञान, आरोग्य आणि उपयोजित विज्ञान, मानसशास्त्र आणि व्यवसाय यांसारखे अभ्यासक्रमांसाठी येथे संधी आहे.’’ ‘पीपल लिंक’ केंद्राने देशात ५०० हून अधिक वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि संबंधित आरोग्य समुपदेशन यशस्वीपणे केले असून आहे. तसेच परदेशातही २०० हून अधिक प्रवेश मिळवून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

