अकरावी प्रवेशाच्या 
चौथ्या विशेष फेरीस सुरुवात

अकरावी प्रवेशाच्या चौथ्या विशेष फेरीस सुरुवात

Published on

पुणे, ता. १८ : अकरावीच्या प्रवेशासाठी चौथ्या विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना २३ ऑगस्टपर्यंत नवीन अर्जनोंदणी, अर्ज भरून कागदपत्रांची पडताळणी करणे, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहे. या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी २६ ऑगस्टला जाहीर होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या चौथी विशेष फेरी सुरू आहे. कॅप प्रवेश प्रक्रियेत एकूण एक लाख ७४ जागा होत्या. त्यातील ६५ हजार ४०३ जागांवर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप ३४ हजार ६७१ जागा रिक्त आहेत. या प्रक्रियेत एकूण एक लाख एक हजार ५८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यात ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त प्रवेश झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे वर्गदेखील सुरू केले आहेत. आता पुढील टप्प्यात दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com