कर्करोग रुग्णांमध्ये गरज वेदना व्यवस्थापनेची
पुणे, ता. १८ : ‘‘कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वेदना व्यवस्थापनेची गरज निर्माण झाली आहे. त्यातून रुग्णांचे जगणे सुसह्य करणे आता शक्य झाले आहे. याबद्दल रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये जनजागृती करणे याला प्राधान्य देण्याची वेळ आता आली आहे,’’ असे पेनेक्स क्लिनिकमधील मणकातज्ज्ञ तसेच वेदना व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. निवेदिता पागे यांनी सांगितले.
कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औषधोपचाराबरोबरच त्यांच्या वेदनांचे व्यवस्थापन ही आता एक मोठी गरज झाली आहे. या पार्श्वभूमिवर डॉ. पागे म्हणाल्या, ‘‘कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे महत्त्वाचे असते. रुग्ण आधीच अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत असतो. अशा वेळी त्यांना वेदनांचे अधिकचे ओझे जाणवायला नको. प्रत्येक रुग्णाला वेदनांपासून सुटका मिळवण्याचा अधिकार आहे. योग्य वैद्यकीय कौशल्य, सहानुभूतीची भावना आणि जागरूकता वाढवणाऱ्या शिक्षणाच्या आधारावर वेदना व्यवस्थापन करणे शक्य असते. त्यासाठी ‘आधार आणि समर्थ’ उपक्रम राबवत आहोत. त्यातून फक्त शारीरिक अस्वस्थता दूर करण्यापुरतेच मर्यादित नसून, कर्करोगाला तोंड देणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवणे, त्यांच्यात चिकाटी आणि आशेचे बीज पेरणे असाही एक उद्देश अंतर्भूत आहे.’’
वेदना व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. काशिनाथ बांगर म्हणाले, ‘‘कर्करोगामुळे केवळ शारीरिक आव्हानेच येतात असे नाही तर त्यासोबतीने प्रचंड वेदनाही येतात. रुग्णाच्या जीवनाच्या गुणवत्ता ढासळते. अशी वेळी रुग्णांना परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

