

कर्वे रस्त्यावर आता
दुचाकी पार्किंगला मुभा
पुणे, ता. १८ : कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौक ते दशभुजा गणपती चौक दरम्यान चार चाकी वाहनांबरोबरच काही ठिकाणी दुचाकी वाहने उभी करण्यासही वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी परवानगी दिली. अशी परवानगी मिळावी म्हणून कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, अजित सांगळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ‘सकाळ’नेही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका, पोलिसांची बैठक घेऊन या रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी परवानगीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर चार चाकी वाहने उभी करण्यास पोलिसांनी तत्काळ परवानगी दिली. त्यापाठोपाठ आता दुचाकी वाहने उभी करण्यासही परवानगी देण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
पार्किंगचा तपशील ः
- रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना बँक ऑफ महाराष्ट्रसमोर १० मीटर, भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी १५ मीटर, युनियन बँक ते स्वप्ननगरी सोसायटी २० मीटर चारचाकी
- सिद्धेश्वर मेडीकल ते कोहिनूर वॉईन्सपर्यंत १५ मीटर आणि गणेश चेंबर, रेबन शोरूम ते अमर हार्डवेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी
- स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना कल्याण ज्वेलर्सशेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो-कलर्स दुकानापर्यंत ५ मीटर येथे दुचाकी
- जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राइम फर्निचर शोरूम पर्यंत २५ मीटर दुचाकी व २५ मीटर चारचाकी-
- भोंडे कॉलनी लेन ते कचरे पथ १० मीटर दुचाकी व १० मीटर चारचाकी
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.