किमती वाढण्याआधीच करा घराची स्वप्नपूर्ती

किमती वाढण्याआधीच करा घराची स्वप्नपूर्ती

पुणे, ता. २१ : गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली घरांची मागणी आणि बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सदनिका आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत वाढ झाली आहे. आगामी काळात या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर खरेदी आवाक्याबाहेर जाण्याआधीच आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे.
घराच्या शोधात असलेल्यांना मदतीचा ठरणारा हा दोन दिवसीय एक्स्पो कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये शनिवार (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) होणार आहे. यात २५ हून अधिक विकसकांचे १०० हून अधिक प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे घर खरेदीचे अनेक पर्याय यानिमित्ताने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. वनपासून फोर बीएचके प्लॅट, व्यावसायिक जागा, बंगलो, रो-हाऊस, रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एनए प्लॉटचे प्रकल्प एक्स्पोत असणार आहेत. त्यामुळे आपली गरज, बजेट आणि ठिकाण या सर्वांचा मेळ घालत घर खरेदीचा निर्णय घेणे सोपे होणार आहे.

घर घेण्याची हीच योग्य वेळ
स्वतःचे घर घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण, सध्या आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मनासारखे घर मिळत नाही. घर आवडले तर बजेटचा मेळ बसत नाही, अशा समस्या येतात. त्यामुळे घरखरेदी पुढे ढकलली जाते. मात्र, कोरोनानंतर स्वत:च्या घराची सर्वाधिक गरज निर्माण झाली आहे. गृहकर्जावर कमी व्याजदर तसेच घरखरेदीसाठी आवश्‍यक असलेल्या इतर बाबी सध्या सकारात्मक आहेत. त्यामुळे घर खरेदीची हीच योग्य वेळ आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

एक्स्पोची वैशिष्ट्ये व उपलब्ध पर्याय :
- २५ हून अधिक विकसकांचा सहभाग
- १०० हून अधिक प्रकल्प
- वन ते फोर बीएचके सदनिका
- व्यावसायिक जागा
- बंगलो
- रो-हाऊस
- एनए प्लॉट

सकाळ वास्तू एक्स्पोबाबत :
कधी : शनिवार (ता. २६) आणि रविवार (ता. २७)
कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर
केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
सुविधा ः प्रवेश व पार्किंग मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com