अल्पवयीन मुलाशी लैंगिक अत्याचारप्रकरणी महिलेवर गुन्हा

अल्पवयीन मुलाशी लैंगिक अत्याचारप्रकरणी महिलेवर गुन्हा

शारीरिक संबंध ठेवण्यास
अल्पवयीन मुलास भाग पाडले

पुणे, ता. २१ : एका महिलेने १७ वर्षीय मुलाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा तसेच त्याच चित्रीकरण करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली. त्यावरून कोंढवा पोलिसांनी २८ वर्षीय लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार महिलेवर गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. संबंधित मुलगा तिच्या घराशेजारी राहतो. ‘माझ्याशी बळजबरीने संबंध ठेवल्याची तक्रार पोलिसांत देईन,’ अशी धमकी देत तिने मुलाला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा शारीरिक संबंध ठेवायला लावत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सांगितले. एक मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. ही बाब मुलाच्या चुलत्याच्या निदर्शनास आली. चुलता आणि मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेला समज दिली. परंतु महिलेने त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर मुलाने फिर्याद दिली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com