भांडारकर प्राच्यविद्या संस्था

भांडारकर प्राच्यविद्या संस्था

भारतीय ज्ञान परंपरेवर
अभ्यासक्रमाची गरज

डॉ. महादेवन यांची प्रतिपादन

पुणे, ता. ः भारतीय ज्ञान परंपरा आणखी विकसित होण्यासाठी वैज्ञानिक संशोधन व्हावे आणि त्यातून अभ्यासक्रमाची निर्मिती केली जावी, असे आग्रही प्रतिपादन आयआयएम, बंगळूरचे तज्ज्ञ प्रा. डॉ. बी. महादेवन यांनी केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेतर्फे नवलमल फिरोदिया प्रेक्षागृहात ‘भारतीय ज्ञान परंपरा‘ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. महादेवन यांनी बीजभाषण केले. मुळात भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय, ती विकसित करण्याची गरज अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. संस्थेचे सचिव सुधीर वैशंपायन यांनी चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री अन्नपूर्णादेवी यादव यांनी चर्चासत्रासाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांच्या भाषणाने चर्चासत्राचे औपचारिक उद्घाटन झाले. रावत म्हणाले की, ‘भारतीय ज्ञान परंपरा हा विषय विद्यार्थ्यांसमोर घेऊन जाण्यासाठी आपण नक्की काय करायला हवे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम आणि कार्यप्रणाली विकसित करायला हवी, याची माहिती चर्चासत्रातून घेण्यात येईल.''
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन संस्थेच्या हस्तलिखित विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनंद बापट यांनी केले. त्यानंतर डॉ. प्रदीप आपटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ. भाग्यश्री यारगोप, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांची माहितीपूर्ण व्याख्याने झाली. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समारोपाचे भाषण केले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com