जुगार खेळण्यासाठी घरफोडी, चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

जुगार खेळण्यासाठी घरफोडी, चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत

ऑनलाइन जुगारासाठी घरफोडी करणाऱ्याला अटक
११ लाख रुपयांची रोकड उडविल्याचे तपासात निष्पन्न
पुणे, ता. २१ : ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्यासाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. मनीष जीवनलाल राय (वय २९, रा. कोहिनूर प्लॅनेट सांगवी रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. त्याने चोरलेले ५५ तोळे सोन्याचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. त्यातून चोरलेली ११ लाखांची रोकड त्याने ऑनलाइन जुगारात उडविल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (वय ७५, रा. सांगवी रस्ता, औंध) यांनी फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांचा खतनिर्मितीचा व्यवसाय आहे. त्यांच्या बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. पोलिसांनी पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण करीत रायला अटक केली. तो मूळचा मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील खमतारा येथील रहिवासी आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com