टिळक-आगरकरांच्या विचारांत मुक्तीचे समानसूत्र

टिळक-आगरकरांच्या विचारांत मुक्तीचे समानसूत्र
Published on

पुणे, ता. २८ ः ‘‘लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांमधील समानसूत्र मुक्तीचे आहे. विस्तारवादी साम्राज्यशाहीला टिळक यांचा विरोध होता. टिळक, आगरकर आणि अण्णा भाऊ साठे या तिघांच्या संपूर्ण विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वायत्त, जबाबदार माणूस घडताना सर्व प्रकारची मुक्ती हा आहे’’, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी व्यक्त केले.
मातंग साहित्य परिषदेतर्फे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित ‌‘जागर महापुरुषांच्या विचारांचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. श्यामा घोणसे, डॉ. टिळक, विवेक मासिकाचे सहसंपादक रवींद्र गोळे हे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ समीक्षक-विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, संपत जाधव, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, डॉ. अंबादास सकट, विसाजी लांडगे आदी उपस्थित होते.
डॉ. घोणसे म्हणाल्या, ‘‘टिळक-आगरकर यांचे विचार हा पुरोगामी महाराष्ट्राचा पाया आहे. मतभेद, विचारभेद असले तरी चालतील; पण मनभेद झाल्यास राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण होतो, अशी आगरकर यांची भावना होती.’’ संपत जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com