Dengue vaccine : डेंगीविरोधातील लस निर्मितीची तिसरा टप्पा सुरू

‘‘प्राणघातक डेंगीच्या आजारावर रामबाण ठरणाऱ्या लस निर्मितीचा तिसरा टप्पा पार पडला आहे.
Dengue vaccine
Dengue vaccineesakal
Published on

पुणे : ‘‘प्राणघातक डेंगीच्या आजारावर रामबाण ठरणाऱ्या लस निर्मितीचा तिसरा टप्पा पार पडला आहे. या टप्प्याचे विश्लेषण सुरू असून, सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जात आहे,’’ अशी माहिती जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले यांनी दिली.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. गोखले पुण्यात आले होते.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘‘डेंगीच्या लशीवर संशोधन सुरू आहे. त्याचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झाला असून आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्याचे विश्लेषण सुरू आहे. लस निर्मितीत सुरक्षितता महत्त्वाची असते. त्याच बरोबरच परिणामकारकता किती आहे, हे तपासले जाते.

त्याची माहिती या चाचणीतून मिळेल. लस दिलेल्यांमध्ये डेंगीच्या सर्व विषाणूंविरोधात प्रतिपिंडे (अँटिबॉडिज) तयार होतात का?, याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सुरक्षिततेची खात्री केल्याशिवाय लस उपलब्ध करून दिली जाणार नाही. अन्यथा त्यातून मोठ्या समस्या उभ्या राहतील. यात प्रतिपिंडे वाढविणारी एक व्यवस्था आहे.

त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.’’ लस विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा चाचणी आणि दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांवर प्रयोग केला जातो. तिसऱ्या टप्प्यात मानवी चाचणी करण्यात येते. कोरोनाची लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येच डेंगीची लस उत्पादित करण्यात येणार आहे.

देशात २०२१ मध्ये एक लाख ९३ हजार रुग्णांना डेंगीचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून डेंगीची लस किती गरजेची आहे, हे अधोरेखित होते. पुण्यात वर्षभरात डेंगीचे ८६ रुग्ण आढळले आहेत. स्वच्छ पाण्यावर अंडी घालणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या मादीपासून याचा संसर्ग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com