gasband wife
gasband wife sakal

Pune News : पत्नीच्या दुसऱ्या लग्नासाठी पतीची माघार

१२ वर्षांच्या मुलाचा ताबा वडिलांकडे असेल. मात्र त्याच्या शिक्षणाचा खर्च दोघांनी उचलायचा. तसेच मुलगा सुटीला आल्यानंतर तो दोघांकडे राहील.

पुणे - नातेवाईक आणि समुपदेशकांनी वेळोवेळी समजावले. पतीने देखील तिला नांदण्याची विनंती केली. मात्र तिचे विवाहबाह्य संबंध होते. तिला त्याच व्यक्तीबरोबर लग्न करायचे असल्याने पतीने पुढाकार घेत पत्नीला संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी दाखवली. घटस्फोटापूर्वी सहा महिने विभक्त राहण्याची अट पूर्ण झाल्यानंतर अखेर या जोडप्याने समझोत्याने घटस्फोट घेतला.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी हा निकाल दिला.

१२ वर्षांच्या मुलाचा ताबा वडिलांकडे असेल. मात्र त्याच्या शिक्षणाचा खर्च दोघांनी उचलायचा. तसेच मुलगा सुटीला आल्यानंतर तो दोघांकडे राहील, या प्रमुख अटींवर दोघेही घटस्फोट घेण्यासाठी तयार झाले. अनुपमा आणि अनुप (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव. त्यांचा १६ मे २०१० मध्ये विवाह झाला होता. ३१ वर्षीय अनुपमा या शिक्षिका आहेत तर ३७ वर्षीय अनुप हे सरकारी नोकर आहेत. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर या जोडप्यात सातत्याने वाद होत होते.

दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. त्यानंतर पत्नीने नांदावे यासाठी अनुप यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र दुसरे लग्न करायचे असल्याने त्यांनी संसारात रस दाखवला नाही. त्यामुळे वाद मिटावे म्हणून शेवटी दोघांनी ॲड. सुनीता काळे-तावरे यांच्यामार्फत येथील कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

‘त्याने’ देखील सुरू केली घटस्फोटाची प्रक्रीया :
अनुपमा यांना ज्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे, त्याचे देखील लग्न झालेले आहे. त्याला दोन मुले आहेत. मात्र त्याला अनुपमा यांच्याशी लग्न करायचे असल्याने त्याने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. अनुपमा आपल्याशी लग्न करीत नाहीत, म्हणून त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र जोपर्यंत तुझा आणि माझा घटस्फोट होत नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, असे अनुपमा यांनी त्याला स्पष्ट केले होते.

या अटींवर झाला घटस्फोट :
- एकमेकांच्या दुसऱ्या लग्नात कोणीही अडथळा आणायचा नाही
- मुलाच्या संगोपनाबाबत कोणीही एकमेकांवर आक्षेप घ्यायचा नाही
- दोघांनी एकमेकांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतीही तक्रार करायची नाही
- स्त्रीधन आणि संसार उपयोगी वस्तूंचा निर्णय दोघे मिळून घेतील


दोघांनी एकत्र राहावे याबाबत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र पत्नीला दुसरा विवाह करायचा होता. पत्नीची इच्छा नसतानाही एकत्र राहिले तर पुन्हा वाद होतील. त्याचा स्वतःवर, मुलावर व दोघांच्या कुटुंबीयांवर वार्इट परिणाम होर्इल, असा विचार करीत पत्नीने संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार अटी ठरवून दोघे विभक्त झाले.
ॲड. सुनीता काळे- तावरे, अनुपमा आणि अनुप यांचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com