बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी दीपाली शेळके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी दीपाली शेळके
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी दीपाली शेळके

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी दीपाली शेळके

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात परिषदेच्या अध्यक्षपदी दीपाली शेळके यांची निवड करण्यात आली.
निळू फुले कला अकादमीत झालेल्या बैठकीला उदय लागू, दीपक रेगे, अरुण पटवर्धन, सुरेश देशमुख, रवींद्र सातपुते आदी उपस्थित होते. या वेळी उपाध्यक्षपदी अरुण पटवर्धन व नारायण करपे, कार्याध्यक्षपदी दीपक रेगे, प्रमुख कार्यवाहकपदी देवेंद्र भिडे, सहकार्यवाहकपदी जतिन पांडे व प्रकाश खोत, खजिनदारपदी सत्यम कोठावदे आणि सहखजिनदारपदी संध्या धुमाळ यांची निवड झाली. गिरीश भुतकर, सुधीर कदम, अनुराधा काळे, प्रभा काळे, मुग्धा वडके, स्मिता मोघे, राजेंद्र आलमखाने यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
नवनवीन उपक्रम घेऊन शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात परिषदेचे उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.