स्किझोफ्रेनियाग्रस्त तरुणाच्या जीवनात आले परिवर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्किझोफ्रेनियाग्रस्त तरुणाच्या जीवनात आले परिवर्तन
स्किझोफ्रेनियाग्रस्त तरुणाच्या जीवनात आले परिवर्तन

स्किझोफ्रेनियाग्रस्त तरुणाच्या जीवनात आले परिवर्तन

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : दिग्विजय याला गेल्या नऊ-दहा वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे निदान झाले. तो प्रचंड चिडचिडा होता. अचानक त्याला राग येत. त्याला सुरक्षित वाटत नव्हते. अशा स्थितीतील दिग्विजयचे आयुष्य प्रशिक्षणामुळे बदलले. त्याच्यामध्ये आता मोकळेपणा आला. तो आता ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रात मदतनीस म्हणून काम करतो आहे.
सकारात्मकता आणि चांगली वर्तणूक यातून व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. दिग्विजय हे उत्तम उदाहरण आहे, अशी माहिती ‘लाईटहाऊस फाउंडेशन’ला आनंदी दिवसाच्या निमित्ताने प्रसादच्या आईने दिली.
लाईटहाऊस फाउंडेशन या कौशल्य विकास प्रशिक्षण संघटनेच्या वारजे येथील केंद्रात प्रशिक्षण दिग्विजय हा स्कीझोफ्रेनियाग्रस्त तरुण आहे. त्याला २०१२-२०१३ मध्ये स्किझोफ्रेनियाचे निदान झाले. तो अनेक वर्षे या विकाराशी झगडत होता. त्याच्या लवचिकता आणि दृढनिश्चयामुळेच मानसिक आरोग्याच्या समस्या असूनही त्याने उच्च माध्यमिक शिक्षण प्रथम-श्रेणीसह पूर्ण केले.
लाईटहाऊस प्रशिक्षण केंद्रात कौशल्य विकास अभ्यासक्रमाबरोबरच केंद्रातील प्रशिक्षक, कर्मचारी व सह- प्रशिक्षणार्थी यांच्याकडून दिग्विजयला आदर व प्रेम मिळाले. त्यातून त्याच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्याचे मन रमू लागले. परिणामी त्याचा चिडचिडेपणा, राग कमी होऊ तो आनंदी राहू लागला. त्याच्यातील हा सकारात्मक बदल, त्याच्या आयुष्यातील हे परिवर्तन पाहून पालकांना देखील अतिशय आनंद झाला. त्याने प्रशिक्षण पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांच्या एका विरंगुळा केंद्रात मदतीस म्हणून काम करत आहे. आपल्या उत्तम कामामुळे तो एक सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी बनला, असेही त्याच्या आईने सांगितले.