शिवाजीनगर बस स्थानकाच्या तळमजल्यावर आगार ?

मेट्रोने दिला एसटी महामंडळाला प्रस्ताव, २० मजली इमारत बांधण्याचा विचार

शिवाजीनगर बस स्थानकाच्या तळमजल्यावर आगार ? मेट्रोने दिला एसटी महामंडळाला प्रस्ताव, २० मजली इमारत बांधण्याचा विचार

पुणे, ता. २७ ः शिवाजीनगर बस स्थानक मूळ जागीच होणार असला तरी अद्यापही शिवाजीनगर आगाराचा प्रश्न सुटलेला नाही. मेट्रो प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाला चार प्रस्ताव दिले असून पैकी शिवाजीनगर आगार हे बस स्थानकाच्या तळमजल्यावर करण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. मात्र, या बाबत अद्यापही एसटी प्रशासन व मेट्रो प्रशासन यांच्यात एकमत झालेले नाही. त्यामुळे शिवाजीनगर आगार कुठे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाजीनगर बस स्थानकाची एकूण १५ हजार स्केअर फूट जागा आहे. पैकी ३ हजार स्केअर फूटची जागा मेट्रोने आपले स्थानक बांधण्यासाठी वापरले आहे. उर्वरित १२ हजार स्केअर फूटच्या जागेची मालकी एसटी प्रशासनाची आहे. या जागेवर मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हब उभारण्याचा प्रस्ताव आहे. शिवाय २० मजली कमर्शिअल इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे ६०५ कोटींचा खर्च अपेक्षित असून तो खर्च मेट्रो व एसटी प्रशासन करणार आहे. मात्र, त्याचे प्रमाण किती असणार आहे, या बाबत कोणताही निर्णय झाला नाही. एसटी प्रशासनाने या विषयीचा अहवाल १५ दिवसांत तयार करून मेट्रो प्रशासनाला सादर करणार आहे. त्यानंतरच आगार कुठे करायचा हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

दोन प्रस्तावावर एसटीचे फुली :
मेट्रो प्रशासन व एसटी प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत मेट्रोने एसटीला चार प्रस्ताव दिले. यातला पहिला तळघरात आगार करण्याचा तर दुसरा सांगवी येथे आगार करण्याचा आहे. तळघरात आगार करण्यात खर्चाची किंमत वाढणार आहे. एसटीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी प्रशासन यासाठी जास्त खर्च करण्याच्या मानसिकतेत नाही. तर सांगवी डेपो हलविला तर रिकामी एसटी आणणे व घेऊन जाणे यात डेड मायलेज जास्त होतो. त्यामुळे एसटीचा याला देखील ना आहे.

एसटी १५ दिवसांत अहवाल देणार :
शिवाजीनगर आगार कुठे करायचे हा प्रश्नावर एसटी प्रशासन विचार करीत आहे. यासाठी अंतिम निर्णय एसटी प्रशासनाला घ्यायचा आहे. त्यामुळे एसटी प्रशासन शिवाजीनगर बस स्थानक बांधताना आगार कुठे करायचे व मल्टी मॉडेल हब साकारताना कमर्शिअल कॉम्प्लेक्सच्या बाबतीत व्यवहार्यता अहवाल सादर करणार आहे. १५ दिवसांत सर्व बाबींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करून मेट्रो प्रशासनाला सादर केला जाईल.

कोट : एसटी प्रशासन व मेट्रो मध्ये बैठक झाली. यात आम्ही चार प्रस्ताव दिले. यात बस स्थानकाच्या तळघरात आगार बांधण्याचे आम्ही सुचविले आहे. आता यावर एसटी प्रशासनाला निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- अतुल गाडगीळ, संचालक, पुणे मेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com