‘हिंमत का तराना’ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हिंमत का तराना’ कार्यक्रम
‘हिंमत का तराना’ कार्यक्रम

‘हिंमत का तराना’ कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : ‘गुरुकृपा’ संस्थेने तिसाव्या वर्षांत पदार्पण केल्याच्या निमित्ताने खडकीतील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ‘हिंमत का तराना’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
या प्रसंगी अनिता घाटणेकर, डॉ. सुभाष कोकणे, महारुद्र धुमाळ (सेवारत्न पुरस्कार), रश्मी देशमुख(कलारत्न पुरस्कार) आणि संजय मरळ, सुनीता चौधरी यांना (गानरत्न पुरस्कार) देण्यात आला. यावेळी संजय मरळ, सुनीता चौधरी, अनुपम बॅनर्जी, मुकुंद पारनेरकर आदींनी सुरेख गाणी गायली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत थोरात यांनी केले.