Thur, Sept 28, 2023

‘जेनिफर अँड दी बिस्ट’ला पुरस्कार
‘जेनिफर अँड दी बिस्ट’ला पुरस्कार
Published on : 29 May 2023, 1:15 am
पुणे, ता. २९ : ‘जेनिफर अँड दी बिस्ट’ या अशोक इंदलकर लिखित पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य प्रतिष्ठानचा स. ह. मोडक पुरस्कार मिळाला आहे. जेनिफर या युवतीचा पाठलाग, नरभक्षक वाघ, घनदाट जंगल, भारतीय अध्यात्म याचे वर्णन असलेले वास्तव व कल्पनेवर आधारित हे पुस्तक आहे. इंदलकर महाराष्ट्र पोलिस दलात असून, सध्या ते स्वारगेट पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.