ऑलिम्पियाडमध्ये
पुण्यातील तिघांचे यश

ऑलिम्पियाडमध्ये पुण्यातील तिघांचे यश

पुणे, ता. १ : पुण्यातील तीन विद्यार्थ्यांनी २०२२-२३च्या एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत इंटरनॅशनल रँक मिळवला आहे. संस्कृती स्कूल, भुकूम कॅम्पसच्या प्रथित व्ही. उपाध्यायने नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये रँक एक मिळवून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक व प्रमाणपत्र पटकावले आहे. श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या हितेश एन. नाकवे या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड रँक एक, ५०,००० रुपये, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आणि मेरिट प्रमाणपत्र तर एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूलच्या सहावी इयत्तेमधील तनय टी. वैष्णव या विद्यार्थ्याने इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड रँक, दीड लाख रुपये, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आणि मेरिट प्रमाणपत्र मिळवले आहे. २०२२-२३ च्या एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत पुण्यातून २.८५ लाखांहून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com