पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे, ता. ९ : लाखो वारकरी आणि भाविकांचा सहभाग असलेल्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे सात हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त असेल. तसेच, वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पालखी सोहळ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. वारकरी, भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून सुमारे सात हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त

---
गुन्हे शाखेची पथके तैनात
सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून पोलिस पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत. गुन्हे शाखेतील १५० पोलिस कर्मचाऱ्याचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.
------
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास मनाई
शहरात पालखी सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. तथापि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करणाऱ्या संस्था आणि आयोजकांना त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक राहील, अशी माहिती गुन्हे शाखेचे (अतिरिक्त कार्यभार, विशेष शाखा) पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
-------

पालखी सोहळा पोलिस बंदोबस्त

पोलिस उपायुक्त- १०
सहायक पोलिस आयुक्त- २
पोलिस निरीक्षक- ९७
सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक- ३२८
पोलिस कर्मचारी- तीन हजार ५४५
राज्य राखीव पोलिस दल आणि होमगार्ड
------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com