गुन्हे वृत्त-२
कात्रजमधील घरफोड्याला अटक
पुणे, ता. १६ : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक करून भारती विद्यापीठ पोलिसांनी ७० ग्रॅम सोन्याचे चार लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले. अमीर समीर पठाण ऊर्फ लकी (वय २४, रा. कात्रज) असे त्याचे नाव आहे. त्याने घरफोडीचे पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले. भारती विद्यापीठ आणि कात्रज परिसरातील सोसायट्यांमध्ये त्याने गुन्हे केले होते. दिवसभर बंद घरे हेरून तो गुन्हे करायचा. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गौरव देव, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---
चेष्टा केल्याने तरुणावर कोयत्याने वार
पुणे, ता. १६ : चेष्टा केल्याच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना बुधवारी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या मारहाणीत आदित्य राजेंद्र बर्डे (वय २२) आणि त्याचा भाऊ ऋषी (दोघे रा. संतोषनगर, कात्रज) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य विशाल गोसावी (वय २०) आणि ओम चंद्रकांत सावंत (वय १८, दोघे रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदित्यने मंगळवारी रात्री मित्रांसह चहा पिताना एका अल्पवयीन मुलाची चेष्टा केली. त्यावरून वाद झाला. त्यामुळे आरोपींनी आदित्यला मारहाण केली. तसेच ऋषी याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

