ग्राहक पेठेतर्फे संस्कारक्षम वह्यांचा उपक्रम

ग्राहक पेठेतर्फे संस्कारक्षम वह्यांचा उपक्रम

Published on

पुणे, ता. १६ : शाळा सुरू झाल्या असून मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची खरेदी केली जाते. वह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी गेल्या २८ वर्षांपासून टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेतर्फे संस्कारक्षम वह्या हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. या वर्षीदेखील थोरपुरुषांची, वीज व पाणी बचत पर्यावरणविषयक संदेश देणाऱ्या मुखपृष्ठांच्या वह्यांद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.
यंदा पर्यावरणावरील समतोल राखा, वृक्ष संवर्धन, व्यायाम हा आरोग्याचा मूलभूत पाया, एक पाऊल स्वच्छतेकडे, जल है तो कल है, मोबाईलवरील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा अशा प्रकारचे विविध सामाजिक संदेश देणाऱ्या वह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. मुलांसाठी खास विद्यार्थी दालन केले असून, त्यामध्ये वह्यांमधील प्रकार ग्राहक पेठेमध्ये आहेत. पाठक म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना थोर पुरुषांची चित्रे पाहून त्यांचा आदर्श घ्यावा. तसेच मुखपृष्ठावरील विविध संदेशांप्रमाणे अनुकरण करावे आणि प्रत्यक्ष कृतीतदेखील त्यांच्याकडून चांगले वर्तन घडावे. यासाठी हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com