मुळशीतील मांदेडे गावात राबविणार ‘नेट झीरो’ प्रकल्प
पुणे, ता. १६ : मुळशी तालुक्यातील पंधराशे लोकसंख्या असणारे मांदेडे गाव लवकरच ‘नेट झीरो’ होणार आहे. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संकल्पनेतून आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) सहकार्याने हे गाव कार्बनमुक्त करण्याचा मानस असून त्यासाठी ‘नेट झीरो’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
गावातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्थानिक समस्या सोडविण्यावर या प्रकल्पातंर्गत भर दिला जाईल, अशी माहिती प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या प्रकल्पाचे ‘ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर’ आहेत. यावेळी प्राजचे उपाध्यक्ष डॉ रवींद्र उटगीकर, गोखले संस्थेचे डॉ. गुरुदास नुलकर, मांदेडे गावच्या सरपंच सविता वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘‘प्रकल्पातंर्गत गावातील आरोग्य, ऊर्जा, पाणी यांसह गावकऱ्यांचा उदरनिर्वाह, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन विषयांवर पुढील दोन वर्षात काम करण्यात येणार आहे. पाणलोट व्यवस्थापन योजना, ऊर्जानिर्मितीक्षम पिकांची लागवड, पीक पद्धती आणि औद्योगिक वापरातील कच्च्या मालाचे व्यवस्थापन याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल,’’ असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
मांदेडे गावच्या ऊर्जेच्या गरजा, सध्याची उदरनिर्वाहाची साधने, पाण्याची गरज, पाणलोट क्षेत्राचे नकाशारेखन, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, हवामान बदलामुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न यावर आधारित प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम गोखले संस्थेमार्फत सुरू आहे.
मुळशी तालुक्याला निसर्गासह ऐतिहासिक वैभव लाभले आहे. तालुक्याच्या गावांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. खरंतर, प्रत्येक कलाकाराने आपापल्या तालुक्यातील गावाच्या विकासासाठी पुढे यायला हवे.
- प्रवीण तरडे, अभिनेते व दिग्दर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

