दस्तकारी हाट हातमाग बाजार प्रदर्शन खुले

दस्तकारी हाट हातमाग बाजार प्रदर्शन खुले

Published on

पुणे, ता. १६ ः कांजीवरम सिल्क साडी, चंदेरी फॅब्रिक, मुगा सिल्क, बांधणी, कोसा सिल्क, बालुचारी सिल्क साडी, कलमकारी साडी, बनारसी सिल्क साडी, पोचमपल्ली साडी, बोमकाई अशा विविध प्रकारच्या साड्या आणि देशाच्या विविध भागांतील ७० विणकरांचा सहभाग असलेले हामाग बाजार प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता. १८) पुणेकरांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात १९ राज्यांतून कापड आणि हातमाग निवडले आहेत. त्यांची विविध उत्पादनेही येथे आहेत. दस्तकारी हाट हातमाग बाजाराने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हातमागाचा प्रसार आणि प्रचार करणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. माझा हातमाग, माझा अभिमानतंर्गत प्रदर्शनासाठी अस्सल उत्पादने पुणेकरांना पहाता येतील आणि त्यांची खरेदीही करता येईल. कर्वे रस्त्यावर आयुर्वेद रसशाळेजवळील सोनल हॉल येथे सकाळी १०. ३० ते रात्री ९ दरम्यान हे प्रदर्शन खुले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com