‘आरसीसी’च्या विद्यार्थ्यांचे  ‘नीट’ परीक्षेमध्ये यश

‘आरसीसी’च्या विद्यार्थ्यांचे ‘नीट’ परीक्षेमध्ये यश

Published on

पुणे, ता. १५ ः प्रा. शिवराज मोटेगावकर संचलित ‘आरसीसी’च्या विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षेत मोठे यश मिळविले. एकाच इन्स्टिट्यूटमधून ६०० पेक्षा जास्त गुण घेणारे २३५ हून अधिक तर ५०० पेक्षा जास्त गुण घेणारे ११०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.
यंदाही नीट परीक्षेच्या निकालात ‘आरसीसी’च्या चार विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७०० पेक्षा अधिक गुण मिळाले. यामध्ये सायली महिंद्रकर आणि पलक शहा यांना ७२० पैकी ७०५ तर शिवम माहूरे आणि आदित्य शेटकर यांनी ७०० गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केले. गेल्या २३ वर्षांपासून उज्ज्वल निकालाची परंपरा असलेल्या ‘आरसीसी’च्या शिलेदारांनी यंदाही निकालात मानाचा तुरा रोवला आहे. दरम्यान, आरसीसी शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी सर्व भावी डॉक्टरांना पुढील उज्ज्वल करियरसाठी शुभेच्छा दिल्या.
‘नीट-२०२३’चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात आरसीसीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहून आरसीसीच्या लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला, पिंपरी-चिंचवड व पुणे (एफ. सी.रोड) या सातही शाखांत फटाके फोडत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com