चाकण एमआयडीसीचा
वीजपुरवठा होणार सुरळीत

चाकण एमआयडीसीचा वीजपुरवठा होणार सुरळीत

Published on

पुणे, ता. १७ : चाकण एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणाचे कामे वेगाने सुरू आहे. उद्योगांचे वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, ग्राहकसेवेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दिली.
चाकण एमआयडीसीमध्ये महावितरण व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांची संयुक्त बैठक झाली. या वेळी मुख्य अभियंता पवार यांनी ही ग्वाही दिली. अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप बटवाल, पदाधिकारी विनोद जैन, अनिल बजाज तसेच औद्योगिक ग्राहकांच्या ६५ प्रतिनिधींची या वेळी उपस्थिती होती. पवार म्हणाले , ‘‘एसएसएमआर’ योजना व दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून २ नवीन स्विचिंग स्टेशन, १४२ रिंगमेन युनिट, २८ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या कामांना सुरुवात झाली आहे.’’
या वेळी विविध उद्योगांचे संचालक व प्रतिनिधींनी वीजविषयक स्थानिक प्रश्न व अपेक्षांची माहिती दिली. त्यानुसार पवार यांनी संबंधित वीजप्रश्नांचे निवारण करण्यासाठी स्थानिक अभियंत्यांना सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com