सिंबायोसिस किवळेतर्फे कौशल्य विकास कार्यशाळा
पुणे, ता. ः सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी (एसओईस) संचलित सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळेतर्फे नुकतीच ९ वी, १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ‘स्किल बिल्डर्स’ कार्यशाळा सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या मुख्य सभागृहात पार पडली. कार्यशाळेत ३३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उद्घाटन प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या भावना नरसिंगोजू उपस्थित होत्या. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण, हँड्स-ऑन ट्रेंनिंग, विविध प्रात्यक्षिके अनुभवता आली. डॉ. मुजुमदार म्हणाल्या,‘‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि व्यावसायिक विकासासाठी कौशल्य शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि नव्याने बदलत चाललेल्या रोजगारांच्या गरजांसाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. केवळ तांत्रिक कौशल्यांवर भर न देता संवाद कौशल्ये, सांघिक कार्य यासारख्या कौशल्यांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

