शहरातील १३ स्मशानभुमी होणार अद्ययावत

शहरातील १३ स्मशानभुमी होणार अद्ययावत

Published on

पुणे, ता. १६ : शहराच्या विविध भागातील १३ स्मशानभुमी अद्ययावत करण्यात येणार असून त्यामध्ये पर्यावरण पुरक यंत्रणा, गॅस व विद्युत दाहिन्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही कामे सध्या सुरू असून लवकरच ती पूर्ण होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिका प्रशासनाच्या वैकुंठ स्मशानभूमी, कैलास स्मशानभूमीसह शहराच्या विविध भागात स्मशानभुमी आहेत. काही स्मशानभूमीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या सातत्याने निर्माण होत आहेत. संबंधित समस्या तातडीने दूर करून तेथे गॅस, विद्युत दाहिनी निर्माण करणे, बदलणे तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपुरक यंत्रणा बसविण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. याबरोबरच स्मशानभुमी अद्ययावत करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. विशेषतः बहुतांश स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. शहरातील खराडी, बावधन, औंध, वाघोली, बोपोडी, हडपसरमधील गंगानगर, धनकवडी, कोथरूड, आंबेगाव, कोरेगाव पार्क आदी भागातील स्मशानभूमीमध्ये संबंधित कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com