पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर 
बारकाईने लक्ष ः आयुक्त

पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर बारकाईने लक्ष ः आयुक्त

Published on

पुणे, ता. १६ ः पावसाने ओढ दिल्यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पावसाची स्थिती बघून ३० जूनला आढावा घेऊ, त्यानंतर हवामान खात्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पुणे शहराला खडकवासला व भामा आसखेड या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणी बचतीवर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी पाणी गळती थांबविण्याबरोबरच खराब वॉल्व्ह बदलणे व अन्य कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
याबाबत विक्रम कुमार म्हणाले, ‘‘मागील वर्षी जून महिन्यात पाऊस झाला होता, या वेळी १५ जूननंतरही पाऊस नाही. २० जूनपर्यंत पाऊस होईल, अशी शक्‍यता आहे. तरीही २८ ते ३० जून या कालावधीत पाण्याची स्थिती महापालिकेकडून पाहिली जाईल. त्यानंतर हवामान खात्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com