वसंतदादा प्रतिष्ठानतर्फे जिजाऊंना अभिवादन

वसंतदादा प्रतिष्ठानतर्फे जिजाऊंना अभिवादन

Published on

पुणे, ता. १८ : राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वराज्याच्या महामंत्राने संपूर्ण देशाला नवचेतना व नवसंजीवनी देण्याचे रचनात्मक कार्य छत्रपती शिवरायांनी केले. स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला आयुष्यभर झोकून देत, ध्येय गाठणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आहेत. जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शिवछत्रपतींचा प्रेरणास्रोत आहेत.’’ असे मत जालिंदर कामठे यांनी अभिवादन करताना व्यक्त केले. या वेळी प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, दीपक सातव, गणेश शेजवळ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.