निबंध स्पर्धेत हीना बागवान प्रथम

निबंध स्पर्धेत हीना बागवान प्रथम

Published on

पुणे, ता. १८ : ‘जनआंदोलनोंका राष्ट्रीय समन्वय’ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून वाई येथील किसनवीर महाविद्यालयातील विद्यार्थिनी हीना बागबान हिने प्रथम क्रमांक पटकावला. बुलडाणा येथील जी. एस. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्सच्या स्मिता पोरवाल हिने दुसरा, तर उमरेड येथील नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील दिव्या मघुलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने देशभर ‘आझादी की राह पर’ हे अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत महाराष्ट्रात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इला कांबळी, आरती बरिदे, सुचित्रा वैद्य आणि डॉ. संजय मं. गो. यांच्या समितीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.