सिंहगड विधी विद्यालयात अभिरूप न्यायालय स्पर्धा

सिंहगड विधी विद्यालयात अभिरूप न्यायालय स्पर्धा

Published on

पुणे, ता. १८ : राष्ट्रीय स्तरावरील श्रीमती काशीबाई नवले अभिरूप न्यायालय स्पर्धा नुकतीच सिंहगड विधी विद्यालयात मूट कोर्ट हॉलमध्ये पार पडली. यात चार राज्यांतील २५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होते. स्पर्धेचे उद्‍घाटन न्यायमुर्ती श्रीहरी डावरे यांचा हस्ते झाले. अभिरूप न्यायालय तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत करेल. अभिरूप न्यायालय म्हणजे कायदेशीर संकल्पना आणि कायदेशीर कार्यवाहीच्या तरतुदींचा अभ्यास समजून घेण्यासाठीचा सराव आहे, असे न्यायमुर्ती डावरे म्हणाले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. नितीन भंडारे आणि सहसमन्वयक म्हणून प्रा. मंजूषा मुदगलकर यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.