तरुणांकडून ५६ किलो गांजा जप्त

तरुणांकडून ५६ किलो गांजा जप्त

Published on

पुणे, ता. १८ : गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता परिसरातून रविवारी अटक केली. या तरुणांच्या ताब्यातून ११ लाख ७० हजार रुपयांचा ५६ किलो गांजा जप्त केला आहे.
राम राजेश बैस (वय २०, रा. रामपुरी वॉर्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय २१, रा. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा) आणि निकेश पितांबर अनोले (वय २२, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील कर्मचारी नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी गडचिरोलीतील तिघेजण चंदननगर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि रवींद्र रोकडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी ५५ किलो गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.