
अवती भवती
अवती भवती
श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
पुणे ः नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे नुकतेच लोणीकंद येथे आयोजन करण्यात आले होते. डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव विशाल शेवाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्रमसंस्काराबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर या शिबिराच्या माध्यमातून भर देण्यात येत आहे. या वेळी प्राचार्य जगन्नाथ म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनावणे आदी उपस्थित होते.
जनकल्याण फाउंडेशनतर्फे समाजरत्न पुरस्कार
पुणे ः जनकल्याण फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ पद्धतीने कार्य करणाऱ्या समाजसेवकांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात गणेश राख, संजय भैलुमे, अमोल करचे, अनुराज सोनवणे, सह्याद्री सर्च ॲण्ड रेस्क्यू भोर, आधार फाउंडेशन, अस्तित्व प्रतिष्ठान आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच संकेत शिंदे, जयवंत देशपांडे, अतुल किंद्रे यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उद्योजक किसन भोसले, अभिजित फडणीस, रामदास चव्हाण, उदय जगताप, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. आयोजनात पदाधिकारी संतोष जाधव, विद्या ठिपसे आदींचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.