भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

Published on

पुणे, ता. २३ : नॉयलॉन मांजा जिवावर बेतण्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. पण ना पोलिसांना जाग आलेली आहे, ना मांजा विक्रेत्यांना याचे गांभीर्य समजलेले आहे. त्यामुळे ‘भय इथले संपत नाही...’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वारजे येथील ढोणेवाडाजवळ रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अशी एक भयानक घटना घडली. रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या नॉयलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे एक हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाला. श्रीकांत लिपाणे (वय २७) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात निखिल गोपीनाथ लिपाणे (वय २९, रा. दत्तनगर रोड, जांभूळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलतभाऊ श्रीकांत लिपाणे हे दुचाकीवरून त्यांच्या आईसोबत पुनावळे येथून जांभुळवाडीकडे जात होते. त्यावेळी ढोणेवाडा जवळ सर्व्हिस रोडवर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. हे पाहून लोकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

अशी आहे भयानक स्थिती
- नागरिक आणि पक्षांना गंभीर दुखापत होऊ नये, यासाठी नॉयलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी
- परंतु पुण्यात होत असलेल्या घटनांवरून पोलिसांच्या आदेशाचा भंग करून नॉयलॉन मांजाची विक्री होत असल्याचे स्पष्ट - पतंगबाजीसाठी वापरलेल्या नायलॉनच्या मांजाने रस्त्यावर लोक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत
- काही ठिकाणी रस्त्यांवर झाडाला, विजेच्या खांबास मांजा लटकल्याचे दिसून येत आहे
- त्यामुळे दुचाकी वाहनचालकांच्या जिवाला धोका
- दुचाकीवरून जाताना दोन पोलिस कर्मचारी, अग्निशामक दलाचा जवान गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली
- पक्षी गंभीर जखमी वा त्यांना प्राण गमवावे लागले आहेत


फक्त नायलॉन मांजा जप्त करण्याची लुटुपुटूची कारवाई करून चालणार नाही तर मांजा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची वेळ आता आली आहे. पण यासाठी पोलिस यंत्रणेला जाग येणे गरजेचे आहे. तोपर्यंत नागरिकांनी सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com