पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अभ्यासक्रम
पुणे, ता. २३ : पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयवार एआयएसएसएमएस व एपीजी लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अभ्यासक्रम ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. योग्य सांडपाणी व्यवस्थापन हे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया आणि व्यवस्थापन केले जाईल, याची खात्री करणे गरजेचे आहे. शासनासोबतच विविध उद्योग-व्यवसाय यासाठी कटिबद्ध होत आहेत. या क्षेत्रात प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कमीतकमी दहावी पास व्यक्तीसुद्धा यासाठी पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०२
लोगो- एसआयआयएलसी
औषधी, सुगंधी वनस्पती लागवड, प्रक्रिया पद्धती
पुणे, ता. २३ : शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा या औषधी तसेच लेमनग्रास, तुळस, पचोली, जिरॅनियम या सुगंधी वनस्पतींची लागवड आणि त्यांच्या प्रक्रिया पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा ४ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. बाजारपेठेच्या मागणीचा अभ्यास करून त्याप्रमाणे लागवड तसेच प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गरजेनुसार नियोजन केल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कार्यशाळेत अशाच औषधी व सुगंधी वनस्पतींवर लक्ष केंद्रित केले आहे. या वनस्पतींची शास्त्रोक्त लागवड पद्धती, त्यांची काढणीपश्चात प्रक्रिया तसेच मार्केट उपलब्धता इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.