औरंगाबाद विभागाची भक्ती खोजे पहिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद विभागाची 
भक्ती खोजे पहिली
औरंगाबाद विभागाची भक्ती खोजे पहिली

औरंगाबाद विभागाची भक्ती खोजे पहिली

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : भूमिअभिलेख विभागाच्या वतीने भूकरमापक पदाच्या सरळसेवा भरतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात औरंगाबाद विभागातील भक्ती राजेंद्र खोजे ही मुलगी पहिली आली असून, तिला २०० पैकी १९० गुण मिळाले. तर पुणे विभागात प्रसाद भागवत गलांडे (१८८ गुण) मिळवून पहिला आला आहे.
मुंबई विभागात भागवत माणिक सांगळे (१८८ गुण), नाशिक विभागात यश सुनील अहिरे (१८२ गुण) अमरावती विभागात भक्ती रमेश लकडे (१७८ गुण), नागपूर विभागात प्रतिक बबनराव गावंडे (१८४ गुण) मिळविले आहेत.
भूमिअभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमुह संवर्गातील भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक या पदाची रिक्त पदे भरण्यासाठी २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस या कंपनीच्या वतीने राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, या विभागासाठी एकूण १ हजार २६८ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला एकूण ४६ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. ऑनलाइन परीक्षेला ३२ हजार ६३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. एकूण परीक्षेस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २६ हजार १०२ अशी होती. या परिक्षेचा निकाल भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रत्येक जात प्रवर्गनिहाय निवडसूची पुढील आठवड्यात महाभूमी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच

निवडसुचीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सूचनादेखील प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. निवडसुचीत समाविष्ट उमेदवाराला त्याने परीक्षेसाठी नोंदणीकृत अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांकावर माहिती देण्यात येणार आहे.
- आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख विभाग