कॅबने पावसातच प्रवाशांना ‘लुटले’

कॅबने पावसातच प्रवाशांना ‘लुटले’

मुसळधार पावसाने पुणेकरांची अक्षरशः दैना उडाली. रस्त्यांवर अडकून पडलेल्या प्रवाशांनी ‘कॅब’ बुक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना किमान ४० मिनिटांची प्रतीक्षा करावी लागती होती, तर २ किलोमीटरच्या प्रवासासाठी त्यांना ४०० ते ५०० रुपयांचे भाडे द्यावे लागत होते. काहींनी कॅब करून घरचा रस्ता गाठला, तर काही जणांनी रिक्षाचा आधार घेतला. सामान्य प्रवासी मात्र दुकानाचा आडोसा घेत थांबून राहिला. पावसाची उघडीप झाल्यावर तो चालता झाला.
पावसाळा सुरू झाल्यावर कॅब कंपन्या दरांत वाढ करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. सामान्य दराच्या तुलनेत १५ टक्के वाढ करण्याचा अधिकार कॅब कंपन्यांना आहे. मात्र शनिवारी कॅबचालकांनी पुणेकरांना चांगलाच दणका दिला. सामान्यपणे शनिवार वाडा येथून डेक्कन जिमखान्यावर जाण्यासाठी कॅबचे दर १०० ते १५० रुपये आकारले जातात. शनिवारी पाऊस सुरू झाल्यावर मात्र हा दर ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर हडपसरपर्यंतचे दर १२०० पर्यंत होते.

स्विगी, झोमॅटोला एक तास
पावसामुळे घरात बसलेल्या पुणेकरांनी स्विगी व झोमॅटोवरून खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. मात्र डिलिव्हरीसाठी एक तास लागत असल्याचा संदेश संबंधित कंपन्यांकडून देण्यात आला. त्यामुळे पुणेकरांना वाट पाहत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com