पर्यावरण साक्षरता नसलेली 
व्यक्ती अशिक्षितः डॉ. सबनीस

पर्यावरण साक्षरता नसलेली व्यक्ती अशिक्षितः डॉ. सबनीस

पुणे, ता. ८ ः ‘‘पर्यावरण दिन साजरा करणे, हे पुढील शंभर पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आपण तंत्रज्ञान साक्षरता, आरोग्य साक्षरता आदींबाबत चर्चा करतो. मात्र पर्यावरण साक्षरता नसलेली व्यक्ती अशिक्षितच असते,’’ असे मत ज्येष्ठ विचारवंत-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांचा डॉ. सबनीस यांच्या सन्मान करण्यात आला. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी आनंद ठाकूर, विठ्ठल गायकवाड, कर्नल रानडे, सतीश गायकवाड, फय्याज इनामदार, संदीप शेंडगे, लक्ष्मीकांत कुंबळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com