विशिष्ट लोकांच्या प्रभावाखाली आश्वासने देणे धोक्याचे
पुणे, ता. १७ : ‘‘काही राजकीय पक्ष विशिष्ट लोकांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत असतील, तर ते देशासाठी धोक्याचे आहे,’’ असे प्रतिपादन अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी रविवारी (ता. १७) आयोजित पत्रकार परिषदेत केले.
राज्यातील विविध संतांचे शिष्टमंडळ या वेळी उपस्थित होते. स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘‘विशिष्ट समाजातील लोकांचा कल हा त्यांच्या समाजाचे मतदान जास्तीत जास्त करण्याकडे असतो. त्यांचे एकगठ्ठा मतदान होत आहे. त्याच्या तुलनेने हिंदूंच्या मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्यामुळे हिंदू समाजाने या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करावे. मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम संतांकडून केले जात आहे.’’
‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘वोट जिहाद’बाबत ते म्हणाले, ‘‘आपण जर जातींमध्ये मत विभाजित केले, तर आपला पराभव होईल. त्यामुळे मत विभाजित होऊ न देता मतदान करावे, असा याचा अर्थ आहे. विशिष्ट धर्मगुरूंकडून फतवे काढून आपल्या समाजाला आवाहन केले जाते. हिंदू धर्म आणि संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’
‘‘आम्हाला सरकार कोणाचे येईल, यामध्ये रस नाही. तर आलेले सरकार हे कोणासाठी काम करणार, यामध्ये जास्त रस आहे. सत्तेत येणाऱ्या सरकारने हिंदू धर्म, तीर्थक्षेत्रे व संतांविरुद्ध काम करू नये, यासाठी आम्ही हिंदू समाजामध्ये जागृती करणार आहोत. ‘जो रामजी को लाए हैं, हम उन्हें लाएंगे’ असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांशी अनुकूल कार्य असलेल्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

