स्कूलिंपिक नेमबाजी

स्कूलिंपिक नेमबाजी

Published on

नेमबाजीत सोहम, अनिरुद्ध, साईराजचा सुवर्णवेध

पुणे, ता. १७ : चिंचवडच्या पोदार इंटरनॅशनलचा सोहम चौगुले, चिखलीच्या एसएनबीपी इंटरनॅशनलचा अनिरुद्ध देवघरे आणि हिंजवडीच्या ब्लू रिज पब्लिक स्कूलचा साईराज पारखी यांनी नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केले.
सोहमने १० मीटर एअर रायफल प्रकारात सर्वाधिक ३९६ गुण मिळविले. त्याने हडपसरच्या पोदार इंटरनॅशनलच्या साईश भिसेला मागे टाकले. पहिल्या फेरीतील दोन गुणांची पिछाडी भिसेला महागात पडली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत दोघांमध्ये बरोबरी होती. चौथ्या फेरीत सोहमने एका गुणाची आघाडी घेत भिसेला तीन गुणांनी मागे टाकले. भिसेला ३९३ गुणांसह रौप्य, तर उंड्रीच्या ध्रुव ग्लोबलच्या विक्रमादित्य सिंग परमारला (३८८) ब्राँझ मिळाले.
स्पर्धेतील १२ ते १४ वर्षे मुलांच्या गटातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात साईराजने ३५८ गुणांचा वेध घेऊन सुवर्णयश मिळवले. उंड्रीच्या ध्रुव ग्लोबलच्या शिवांश कुलथेने (३४१) रौप्य, तर काळेवाडीच्या निर्मल बेथनी शाळेच्या त्रिशिर गुप्तेने (३३५) ब्राँझपदकाची कमाई केली.
निकाल :
१२ ते १४ वर्षे मुले ः १० मीटर एअर रायफल - सोहम (३९६), साईश (३९३), विक्रमादित्य (३८८), लक्षन कल्लीयानी (विबग्योर, मगरपट्टा, ३७५), आरव अगरवाल (इंडस इंटरनॅशनल, मुळशी, ३६८), हर्षवर्धन शर्मा (ध्रुव ग्लोबल, नांदे-मुळशी, ३६३), शुभ महिपाल (विबग्योर, एनआयबीएम रोड, ३५८), अनय खडसे (ध्रुव ग्लोबल, नांदे-मुळशी, ३५५), शिवांश खरे (एसएनबीपी इंटरनॅशनल, मांजरी, ३०६); अहान कुमार (ध्रुव ग्लोबल, उंड्री, २४०).

१४ ते १६ वर्षे मुले ः १० मीटर एअर पिस्तूल - अनिरुद्ध देवघरे (३६२), ईशान लांबे (विबग्योर रूट्स अँड राइस, पिंपळे सौदागर, ३५४); शौर्य नवले (महाराष्ट्रीय मंडळ, ३५१).

१२ ते १४ वर्षे मुले ः १० मीटर एअर पिस्तूल - साईराज पारखी (३५८ ); शिवांश कुलथे (ध्रुव ग्लोबल, उंड्री, ३४१); त्रिशिर गुप्ते (निर्मल बेथनी, काळेवाडी, ३३५); स्वराज देशमाने (सरहद, कात्रज, ३३५); अद्वैत गोडसे (ध्रुव ग्लोबल, नांदे-मुळशी, ३३४); अभिश्रुत पोतदार (सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी, ३१४); रणवीर काळे (द किस्टोन अंकुरम, हांडेवाडी, ३०२); रिशिक कुंदेर (विबग्योर, हिंजवडी, २५३).
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com